टीम इंडियामध्ये झाली अखेर सुरेश रैनाची एन्ट्री
दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडिया मायदेशी परतली. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाने वन-डे सीरिज आणि टी-२० सीरिज आपल्या नावावर केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियात सुरेश रैना याचं खूप दिवसांनी पुनरागमन झालं. यासोबतच त्याने टी-२० सीरिजमध्ये स्वत:चं कर्तुत्व सिद्ध केलं.
सुरेश रैनाने २७ बॉल्समध्ये ४३ रन्स करत तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये विजय मिळवून देण्यास मदत केली. टीम इंडियाने टी-२० सीरिज २-१ ने आपल्या नावावर केली होती. ३ मॅचेसच्या सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये सुरेश रैनाला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला.
टीमचे कोत रवि शास्त्री यांनीही सुरेश रैनाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. नुकतचंएका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत रवि शास्त्री यांनी म्हटले, “सुरेश रैना खूपच अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव काय करु शकतो हे त्याने दाखवून दिलं आहे.” “अनेक दिवस टीममधून बाहेर असलेले खेळाडू आपली टीममध्ये जागा निर्माण करण्याचा पाठलाग करत असतात. पण सुरेश रैनाने आपला परफॉरमन्स दाखवला आहे. सुरेश रैनाने अशी बॅटिंग केली की तो टीममधून कधी बाहेर नव्हताच. त्याची खेळी पाहून खूपच चांगलं वाटलं” असेही रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.