बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (10:25 IST)

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

राज्यात येत्या बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तसेच समुद्रावरून बाष्पयुक्त वारेही येण्याची शक्यता असल्याने बुधवारी मध्य प्रदेश तसेच नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर अशा राज्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रासोबतच विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ाच्या दक्षिणेकडील जिल्ह्य़ांमधील हवा मात्र कोरडी असेल. या गारपिटीमुळे कमाल तापमानात काही अंश से.ची घट होईल असे सांगितले आहे.

काही आठवडय़ांपूर्वी विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते तर  काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता.