शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (10:11 IST)

कृष्णाकुमारी कोहली पाकिस्तानमधील पहिल्या हिंदू महिला सिनेटर

पाकिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिला सिनेटर म्हणून कृष्णाकुमारी कोहली यांना मान मिळाला आहे. त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) सदस्या आहेत. तालिबानशी निगडित असणार्‍या एका मौलानाचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला आहे.

कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1979 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. 9 वीत असतानाच त्यांचा विवाह झाला. मात्र, विवाहानंतरही त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवून सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली.  यानंतर त्या आपल्या भावासह ‘पीपीपी’मध्ये सहभागी झाल्या. त्यांनी केलेल्या विविध कामांच्या जोरावर त्यांना पक्षातून सिनेटरपदाच्या निवडणुकीसाठी संधी देण्यात आली.