रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (11:32 IST)

पाकिस्तानामध्ये 'परी' चित्रपट बॅन

अनुष्का शर्माचा 'परी' हा चित्रपट रिलीज झाला असला तरी पाकिस्तानामध्ये मात्र 'परी' या चित्रपटाला बॅन करण्यात आले आहे. 'परी' हा चित्रपट बॅन करण्यामागे काळी जादू आणि इस्लामविरोधी काही मुल्य दाखवली गेल्याचा दावा पाकिस्तानमध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनल जियो टीव्हीने केलेल्या दाव्यानुसार, चित्रपटामध्ये कुराणातील काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. सोबतच हिंदू मंत्रांसोबत कुराणातील काही गोष्टी एकत्र केल्याने या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये ज्या प्रेक्षकांनी 'परी' चित्रपटाचे  बुकींग केले आहे. त्यांना चित्रपटाच्या तिकीटाचे पैसे परत केले जातील असे नुपलैक्स सिनेमाजने त्यांच्या फेसबुकवर पेजवर  जाहीर केले आहे.