रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (15:28 IST)

'पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही' घटस्फोटाचे कारण नाही

माझी पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही, रोज सकाळी लवकर उठत नाही. ती गृहकृत्यदक्ष नसल्याने तिच्यापासून घटस्फोट मिळावा असा अर्ज मुंबईतील एका माणसाने केला होता. मात्र पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही हे घटस्फोट घेण्याचे कारण असू शकत नाही असे म्हणत मुंबई हायकोर्टाने अर्ज फेटाळला आहे. न्या. के. के. तातेड आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सांगत घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला आहे.  

मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा म्हणून मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. माझी पत्नी गृहतृत्यदक्ष नाही असे या व्यक्तीने म्हटले होते. मात्र ही वागणूक काही क्रूरता नाही, असे सांगितले. ज्या माणसाने अर्ज केला त्याची पत्नी नोकरी करते. किराणा सामानाचे बिल देणे, पती आणि सासरच्या मंडळींसाठी स्वयंपाक आणि इतर घरगुती कामे ती करत होती. असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. पत्नी रुचकर स्वयंपाक करत नाही किंवा सकाळी लवकर उठत नाही हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. कुटुंब न्यायालयात सुरुवातीला हा अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळण्यात आल्यावर या पतीने घटस्फोटासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेची त्याचे अपील नाकारण्यात आले.