बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (10:05 IST)

पालकांनो काळजी घ्या लहान मुलाचा घरातील झोक्याल अडकून मृत्यू

घरातील लहान बाळासाठी बांधलेल्या नायलॉन दोरीच्या झोक्याचा फास लागून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथील सारस्ते गावात ही घटना घडली आहे.

दुपारी दोनच्या सुमारास रविवारी ४ मार्च रोजी उमेश मनोहर कुवर (वय १२, रा. सारस्ते ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) हा घरात बांधलेल्या झोक्यासोबत खेळत होता. मात्र खेळताना त्याला गळ्याला अचानक फास बसला त्यात तो शुद्ध हरपून जखमी झाला होता. ही बाब लक्षात  येताच उमेशला त्याचा चुलत भाऊ दीपक रमेश कुवर याने रुग्णालयात पावणेचार वाजेच्या सुमारास दाखल केले होते.

मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गडेसर यांनी उमेशला तपासले मात्र त्याने  प्रतिसाद न मिळाल्याने त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या आगोदर पालकांच्या निष्काळजीपणामुळे शहरातील सिडको परिसरातील लहान मुलाने १० रुपयांचे नाणे गिळले होते त्यात त्याचा मृत्यू झाला होता.