सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 5 मार्च 2018 (10:04 IST)

मोठी कामगिरी सैनिकांनी दहशतवादी आणि मदत करणारे केले ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. यामध्ये भारतीय लष्कराने एक दहशतवादी तर त्याला मदत करणाऱ्या तिघांना कंठस्नान घातले आहे. त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. आयमध्ये  रविवारी मध्य  रात्री लष्कराच्या पेट्रोलिंग करत असलेल्या टीमवर  दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला होता. त्यावेळी आपल्या भारतीय सैनिकांनी जोरदार उत्तर दिले आहे. यामध्ये आपल्या सैनिकांनी एक दहशतवादी ठार केला आहे. तर सोबतच या घटनास्थळावरून तीन अन्य मृतदेहसुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. हे मृतदेह दहशतवाद्याला मदत करणाऱ्यांचे असल्याचे लष्कराने सांगितले आहे. या घुसखोरी करत असलेल्या अनेक आतंकवादी लोकांना येथील अनेक स्थानिक नागरीक मदत करतात त्यामुळे सैनिकांना मदत कार्य करताना फार अवघड होते. त्यामुळे ही कारवाई मोठी मानली जात आहे. याबद्दल ए एन आय ने अधिकृत वृत्त दिले आहे.