शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जानेवारी 2018 (15:53 IST)

दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला, चार पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरच्या सोपोर शहरात दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला आहे. ज्यामध्ये तब्बल चार पोलीस शहीद झाले आहेत. तसचे अनेक पोलीस जखमी झाले आहेत. स्फोटानंतर या संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घातला आहे.

बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये छोटा बाजार आणि मोठा बाजारमधील एका गल्लीतील दुकानात आयईडी स्फोट करण्यात आला. फुटीरतावादी येथे आंदोलनाच्या तयारीत असल्यानं पोलीस या ठिकाणी गस्त घालत होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच पोलिसांनीकडून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोधही सुरु आहे.