गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:34 IST)

अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार

भारतीय सैन्याने आणि काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. यात्रेवर हल्ला करणारे टॉपचे तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचं ट्वीट शेष पॉल वेद यांनी केलं आहे. सूत्रधार अबू इस्माईलच्या खात्म्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे अबू माविया, फुरकान आणि यावर यांना कंठस्नान घातलं, असं ट्वीट वेद यांनी केलं आहे.

सोमवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर पोलिस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत एक भारतीय जवानही शहीद झाला आहे. याआधी 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता.