शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (09:53 IST)

आता कर्नाटक सुद्धा आमचेच - अमित शहा

Amit Shah

अनपेक्षित असा निकाल देत भाजपाने पूर्ण देशात आपली सत्ता मिळावी आहे. त्याचा विजय साजरा केला जात आहे. यामध्ये उत्तरेतील असलेली राज्यात भाजपची पूर्ण सत्ता आली आहे. यावर अमित शहा म्हाणाले की  त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर भाजपाचे पुढील टार्गेट कर्नाटक राज्य असणार असून  तुम्ही लिहून ठेवा, कर्नाटकमध्येदेखील भाजपच बाजी मारणार, असे वक्तव्य त्यांनी नागपुरात    भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मत व्यक्त केले आहे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष   अमित शहा यांनी संघ मुख्यालयात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. तरीही त्यांनी माध्यमांशी त्यांनी अवघ्या वरील एका वाक्यात संवाद साधला आहे . अमित शहा हे  संघ मुक्यालयात  ४ तास होते.

अमित शहा  डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले होते . त्यानंतर ते थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी गडकरी व शहा यांच्यात सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी शहा यांनी गडकरी यांच्याकडेच भोजन केले. त्यानंतर ते रविभवनकडे रवाना झाले आहेत.