शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:47 IST)

उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर अहमदनगर जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली आहे. खासगी वृत्तवाहिनीने  हे वृत्त दिले आहे. उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्यासाठी अहमदनगरला गेले आहेत. दगडफेकीत शिवसैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निलेश लंके यांच्या गटाने दगडफेक केल्याचा आरोप आहे. निलेश लंके विजय औटी यांचे प्रखर विरोधक समजले जातात. त्यामुळे आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे गरजेचे आहे. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे.