सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:32 IST)

विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांचे गायन

जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, नद्यांचं संवर्धन यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारचं जलसंवर्धन आणि अन्य कामं आपण पाहिलं. पण सरकारचं हेच काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेद्र फडणीस  आपल्या पत्नी अमृता यांच्यासोबत थेट गायकीच्या क्षेत्रात उतरले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनीही आपली हौस भागवून घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आतापर्यंत फडणवीस सरकारने आपली कामं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्रीच गाण्याच्या माध्यमातून जनतेसमोर आले आहेत.