1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. DRS to be implemented in IPL 2018

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच डीआरएस पद्धतीचा वापर

IPL
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच डीआरएस पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. कधीकाळी याचा बीसीसीआयनं विरोध दर्शवला होता. पण काळ बदलला आणि बीसीसीआयनं आयपीएलमध्ये DRS सिस्टमचा वापर करण्याला परवानगी दिली आहे. BCCI सुरुवातीला या प्रणालीबाबत सकारात्मक नव्हते. मात्र बीसीसीआयने या प्रणालीचा आयपीएलमध्ये प्रयोग करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. बीसीसीआयनं 2016 च्या शेवटी इंग्लंडच्या भारत दौऱ्यावेळी बीसीसीआयनं डीआरएसच्या वापरला परवानगी दिली होती. 
 
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,  गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमध्ये डीआरएस पद्धत लागू करण्याचा बीसीसीआय विचार करत होते. यावर्षी त्यांनी अखेर मंजूरी दिली. आपल्या जवळ इतर सर्व प्रणालीसाठी चांगले तंत्रज्ञान आहे तर मग डीआरएस प्रणालीचा वापर का नको? भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यात मागील दोन वर्षापासून वापर करत करत आहे.                                      
पुढील लेख
जिओने प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकला