सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (09:03 IST)

सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची वेबसाईट बंद

होय आपले क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात मोठे आणि श्रीमंत आहे. मात्र आपल्यावर जगासमोर नामुष्कीची वेळ आली आहे. बीसीसीआयची वेबसाईट बंद झाल्याची नामुष्की ओढावली आहे. यामध्ये डोमिन नेम अर्थात  वेबसाईटचं नुतनीकरण न केल्यामुळे बीसीसीआयची वेबसाईट बंद करण्यात आली. त्यामुळे जगात आपली प्रतिमा मलीन झाली आहे. डोमेनची वैधता ही २ फेब्रुवारी २००६ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आहे. वेबसाईटचं नुतनीकरण करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१८ आहे मात्र  बीसीसीआयनं त्यांचे नुतनीकरण केले नाही त्यामुळे वेबसाईटचं बंद पडली. मात्र नामुष्की दूर करत पुन्हा  ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे  सेंच्युरिअनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच सुरु असताना ही वेबसाईट बंद होती.वेबसाईटची नोंदणी करणाऱ्या register.com आणि namejet.com यांनी बीसीसीआयच्या डोमेनच्या नावासाठी बोली सुद्धा लावली होती.  २०१०मध्ये आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींनी हे डोमेन विकत घेतले होते.