बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

खग्रास चंद्रग्रहणामुळे शिर्डीत साई दर्शन बंद

खग्रास चंद्रग्रहण असल्याने साई मंदिर आज चार तास बंद असेल. या वेळेत भक्तांना दर्शन घेता येणार नाही. आज संध्याकाळी 5 ते रात्री 8.42 वाजेपर्यंत मंदिर बंद असेल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. तसंच, साईबाबांची संध्याकाळची धूप आरतीही रद्द करण्यात आली आहे.
 
संध्याकाळी 5 ते रात्री 8.42 वाजेपर्यंत समाधी मंदिरात पुजारी श्रींच्या समोर मंत्रोच्‍चार करतील. या कालावधीत दर्शन पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर रात्री 8.50 वाजता श्रींचे मंगलस्‍नान सुरु होईल. त्‍यांनतर श्रींचे वस्‍त्र अलंकार परिधार करुन श्रींची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल आणि त्‍यानंतर दर्शनरांग सुरु होईल.
 
ग्रहण कालावधीमुळे दिनांक 31 जानेवारी रोजी साईंची धुपारती होणार नाही. तसंच 31 जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता शेजारती आणि दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 वाजता काकड आरती नियमितपणे होईल. ग्रहण कालावधीत टाईम दर्शन, सशुल्‍क दर्शन आणि धुपारतीचे पासेस देण्‍यात येणार नाही, याची साईभक्‍तांनी नोंद घेवून संस्‍थानला सहकार्य करावं, असं आवाहनही अग्रवाल यांनी केलं आहे.