शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (09:21 IST)

शिर्डी : साई दर्शनासाठी पुष्पगुच्छ नेता येणार नाही

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जातांना यापुढे पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव साई संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.

याआधी मंदिरात नारळ घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर वापरलेले पुष्पगुच्छ पुन्हा विक्रीला येत असल्याचं साई संस्थानच्या निदर्शनास आलं. त्याचप्रमाणे अनेक भाविक पुष्पगुच्छ दुरुनच साईंच्या मूर्तीवर फेकत असल्याचं पाहायला मिळालं होतं.सदरचे  प्रकार थांबवण्यासाठी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरुन अखेर पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, फुलं, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मात्र कोणतीही बंदी नसेल, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.