गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (11:55 IST)

सचिनचा सुपरफॅन म्हणतोय 'रंग दे तिरंगा'

क्रीडाविश्वात खेळाडूंच्या वाट्याला प्रसिद्धी येते. पण, याच खेळाडूमुंळे त्यांचे चाहतेही प्रसिद्ध होतात. असाच एक चाहता म्हणजे सुधीर कुमार चौधरी. क्रिकेटच्या मैदानात सचिनचे नाव अंगावर रंगवून तिरंग्याच्या रंगात स्वतःला रंगवून हातात भलामोठा तिरंगा मोठ्या अदबीने घेऊन मैदानात खेळाडूंना प्रोत्साहित करणारा हा सुपरफॅन सुधीर. विविध माहितीपट आणि लघुपटांमधून झळकलेला आणि आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध असणार्‍या सुधीरला आता एक महत्त्वाची संधी मिळाली आहे. ज्यामुळे तो चाहत्यांच्या दुनियेतला सुपरस्टार झाला, असे म्हणायला हरकत नाही.
 
यंदाच्या वर्षी अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या प्रमोशनसाठी 'सोनी पिक्चर्स स्पोट्‌र्स नेटवर्क'ने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. 'रंग दे तिरंगा' असे या उपक्रमाचे नाव असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोनी वाहिनीतर्फे एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला असून सुधीर कुमार चौधरी त्या व्हिडिओमध्ये सर्वांनाच प्रोत्साहित करताना दिसत आहे.
 
सोशल मीडियावर चर्चेत असणार्‍या या व्हिडिओमध्ये ते क्रिकेटविषयी किंवा फक्त  सचिनविषयीच बोलत नसून संपूर्ण देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तो क्रीडारसिकांना विनंती करत आहे. ङङ्गरंग दे तिरंगा' असे म्हणत सुधीरने राष्ट्रकुल स्पर्धेतील विविध खेळांध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूला प्रोत्साहन देण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. मुळात एक चाहता मिळून आता आणखी किती क्रीडारसिकांना एकत्र आणतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.