९९ टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो पोहोचणार
दिवाळीपर्यंत ९९ टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो पोहोचविण्याचे लक्ष जियोने जाहिर केलयं. सॅमसंगला सोबत घेऊन इंटरनेट ऑफ थिंग्स सेवा होणार आहे. यामुळे ग्राहक आणि इंडस्ट्रींना फायदा मिळणार आहे.
आता रिलायन्स जियो कंपनीकडे १६ कोटी ग्राहक आहेत. आम्ही गेल्यावर्षी १७० दिवसांत १० कोटी युजर्सना जोडल्याचे जियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष (टेक्नोलॉजी) तारीक अमीन यांनी सांगितले. १६ महिने पूर्ण होण्याआधीच जियोकडे १६ कोटी युजर्स आहेत.
जियो नेटवर्क टू जी ला मागे सोडणार आहे. आम्हाला प्रत्येक गावातील व्यक्तीला जियोशी जोडायचे आहे असे जियोतर्फे सांगण्यात येत आहे.