रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 1 मार्च 2018 (12:25 IST)

आयपीएलध्ये पहिल्यांदाच डीआरएस प्रणालीचा वापर

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच डीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. कधीकाळी याचा बीसीसीआयने डीआरएस प्रणालीला विरोध दर्शवला होता. पण काळ बदलला आणि बीसीसीआयने आयपीएलमध्ये डीआरएस प्रणालीचा वापर करण्याला परवानगी दिली आहे. बीसीसीआ सुरुवातीला या प्रणालीबाबत सकारात्क नव्हते. मात्र, बीसीसीआयने या प्रणालीचा आयपीएलमध्ये प्रयोग करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एका मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकार्‍याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 2016 च्या
शेवटी इंग्लंडच्या भारत दौर्‍यावेळी बीसीसीआयने डीआरएसच्या वापरला परवानगी दिली होती. 
 
बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, गेल्या काहीदिवसांपासून आयपीएलमध्ये डीआरएस पद्धत लागू करण्याचा बीसीसीआय विचार करत होते. यावर्षी त्यांनी अखेर मंजुरी दिली. आपल्या जवळ इतर सर्व प्रणालीसाठी चांगले तंत्रज्ञान आहे तर मग डीआरएस प्रणालीचा वापर का नको? भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यात मागील दोन वर्षांपासून वापर करत करत आहे.