मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

राजकुमार संतोषी रुग्णालयात दाखल

bollywood news
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.नानावटी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विवेक मेहन यांनी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी म्‍हटले आहे. 
 
राजकुमार संतोषी यांनी घायल, दामिनी, अंदाज अपना अपना, घातक, पुकार, दि लिजेंड ऑफ भगतसिंग यांसारखे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. सध्या ते अभिनेता रणदीप हुडा याला घेऊन एका सिनेमावर काम करीत आहेत.