का अस्वस्थ झाले अमिताभ?
सुपरस्टार श्रीदेवी हिचे दुबईत निधन झाले. ही बातमी लोकांपर्यंत पोहचण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांना बहुतेक काहीतरी वाईट घडणार याची कल्पना होत होती.
बातमी कळण्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांनी रात्री ट्वीट केले होते 'का माहित नाही, एक विचित्र अस्वस्थता जाणवतं आहे' (न जाने क्यूँ, एक अजीब सी घबराहट हो रही है)
उल्लेखनीय आहे की अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी खुदा गवाह या चित्रपटात सोबत काम केले होते. तसेच इंकलाब आणि आखिरी रास्ता यात ही दोघे होते तसेच 2012 साली श्रीदेवीची कमबॅक इंग्लिश विंग्लिश यातही अमिताभ यांची मुख्य भूमिका होती.