अम्मासोबत झळकली होती श्रीदेवी
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या सोबतही श्रीदेवीने चित्रपटात काम केले आहे. जयललिता यांच्या अथी पराशक्ती या पौराणिक चित्रपटात त्यांनी बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जयललिता यांनी शक्ती देवी ची तर श्रीदेवी यांनी मुरूगन देवतेची भूमिका केली होती. या फोटोत श्रीदेवी जयललिता यांच्या मांडीवर बसली आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी हा फोटो ट्वीट करत म्हटले होते की ओजस्वी आणि संस्कारी महिलेसोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले. मी कोट्यवधी लोकांसोबत त्यांना मिस करतेय.