1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सोलापूर , गुरूवार, 1 मार्च 2018 (15:56 IST)

राज्यसभा : सुशीलकुार शिंदे निश्चित?

sushil kumar shinde
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणार्‍या एका जागेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुार शिंदे यांचे नाव अग्रभागी असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
 
शिंदे हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असून आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी शिंदे यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. त्यादृष्टीने शिंदे यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय स्तरावरून करण्यात येत असल्याचे सांगणत आले.
 
या जागेसाठी विद्यमान खासदार रजनी पाटील या प्रयत्नशील आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातून परराज्यातील राजीव शु्रला यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील नेच्याचाच विचार करण्यात येत आहे. त्यादृष्टीने शिंदे यांचे अलीकडच्या काँग्रेसच्या उभारणीतील योगदान लक्षात घेऊन व भविष्याचा विचार करून त्यांच्या नावाचा निश्चित विचार करण्यात येत  असल्याचे सांगण्यात येत आहे.