मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (15:23 IST)

व्हिएतनाम : चक्क नवरदेव भाड्याने देण्याचा व्यवसाय

व्हिएतनाममध्ये काही कंपन्या चक्क नवरदेव भाड्याने देऊन प्रचंड पैसा कमवत आहेत. विशेष असे की, या कंपन्या केवळ नवरदेवच नव्हे तर, नातेवाईकही भाड्याने मिळतात. एका लग्नात नवरेदव आणि नातेवाईक भाड्याने  देण्यासाठी कमीत कमी ४ लाख रूपये शुल्क आकारले जाते. ग्राहकाच्या मागणीनुसार या कंपन्या २० ते ४०० पाहुण्यांची व्यवस्था करू शकतात. 
 
व्हिएतनाममध्ये अनेक मुली या कुमारी माता बनतात. तो समाजातला कलंक मानला जातो. त्यामुळे या सामाजिक कलंकातून मुक्तता मिळविण्यासाठी बनावट विवाह केले जातात. त्यामुळे भाडतत्वावर नवरदेव म्हणून लग्नाच्या मंडपात उभा राहणे हा एक तिथला व्यवसायच बनला आहे. भाडेतत्वावर लग्नासाठी उभा राहिलेले बहुतांश नवरेदव हे आगोदच विवाहीत असतात. इतकेच नव्हे तर, ते एक, दोन मुलांचे पिताही असतात.पण, अविवाहीत गर्भवती मुली आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भाडेतत्वावर खरेदी करतात आणि त्यावर त्यांना काहीच चुकीचे वाटत नाही.