शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

धार्मिक सद्भावाचे अनोखे उदाहरण, होळीसाठी नमाजची वेळ बदलली

हिंदू बांधवांना होळी सण साजरा करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी  ईदगाहचे इमाम मौलाना खालीद रशीद फिरंगीमहली यांनी मशिदींना आवाहन करून शुक्रवारच्या नमाजचे पठण निश्चित वेळेपेक्षा अर्धा किंवा एक तास पुढे वाढवून सांप्रदायिक सद्भावनेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे अपील केले. मौलाना खालीद हे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे कार्यकारिणी सदस्यही आहेत.
 
ते म्हणाले, आम्ही ईदगाह नमाजाची वेळ एक तासाने पुढे ढकलली आहे. आता ही नमाज दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी होईल. पूर्वेत होळी खेळत असलेल्या लोकांनी नमाजासाठी जात असलेल्यांवर रंग टाकला होता. त्यावेळी हिंसाचार झाला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी संवेदनशीलता दाखवत हा निर्णय घेतला. शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद यांनीही नमाजाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता ही प्रार्थना १२.२० वाजता होईल. या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि भारतात सांप्रदायिक तणाव असल्याची धारणाही नष्ट होईल, असेही ते म्हणाले.