रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:35 IST)

५ वर्षाखालील बालकांसाठी 'बालआधारकार्ड'

आता ५ वर्षांखालील मुलांकडे आधारकार्ड असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बालआधारकार्ड देण्यात येणार आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. त्यानुसार ५ वर्षाखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल असे सांगण्यात आले आहे. पण हे मूल जेव्हा वयाची वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रीक चाचणी करण अनिवार्य आहे असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याला घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात घेऊन जाऊ शकतात. यूआयडीएआयने आणखी एका ट्विटव्दारे बालआधारकार्डसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालू शकेल असे म्हटले आहे. यामध्ये मान्यताप्राप्त शालेय संस्थेचे बालकाचा फोटो असलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
 
या ट्विटसबरोबरच यूआयडीएआय या नव्या निळ्या रंगाच्या आधारकार्डचे इन्फोग्राफिक्स ट्विटरवर टाकले आहेत. ५ वर्षाच्या आतील मुलांना आधारकार्ड असणे सक्तीचे नसले तरीही परदेशातील शालेय उपक्रमांसाठी, शासकीय शिष्यवृत्तीसाठी त्याची आवश्यकता असते. मूल ५ वर्षाचे झाल्यावर मात्र हे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा यांची बायोमेट्रीक चाचणी होईल.