शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (11:55 IST)

चेतेश्वर पुजाराला कन्यारत्न

भारतीय कसोटी संघात तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आलेली आहे. चेतेश्वरची बायको पूजाने गुरुवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 
 
याचवेळी पुजाराच्या सौराष्ट्र संघाने विजय हजारे करंडकात बडोद्यावर मात करुन उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पुजारासाठी आपल्या मुलीचा जन्म हा दुहेरी आनंद मिळाल्यासारखा झाला आहे.
 
यावेळी पुजाराने आपली बायको पूजा आणि लहानग्या मुलीला सोबत घेऊन एक फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 
 
क्रिकेटसोबत आपण आता वडिलांची जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार असल्याचे सांगत 'छोटुकलीचं स्वागत. आयुष्यात नवीन भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे आम्ही दोघेही आनंदी आणि उत्साही आहोत. आम्ही मनात इच्छा बाळगली आणि ती पूर्ण झाली' असे ट्विट पुजाराने केले आहे. ही बामती शेअर केल्यानंतर पुजाराच्या सहकार्‍यांनीही ट्विटरवर त्याचे अभिनंदन केले आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये चेतेश्र्वरने गर्लफ्रेण्ड पूजासोबत लग्न केले होते.