रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (12:29 IST)

एक लग्नसोहळा दोन जुळ्यांचा

twins marriage
अमेरिकेतील एक असे जोडपे समोर आले आहे जर ते एकत्र उभे राहिले तर समोरच्या व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तेथे राहणारे जुळे भाऊ जॉश आणि जेरेमी सेलर्स यांचा जुळ्या बहिणी असलेल्या मुलींवर जीव जडला. पण विशेष म्हणजे या दोघांनी एकाच वेळी त्या दोघींसोर आपले प्रेम व्यक्त केले आणि आता ते विवाहबद्ध होत आहेत. या दांपत्याबद्दलची सर्वात जमेदार गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरील लोकांच्या प्रतिक्रिया होय. त्यांना पाहताच लोक पहिला प्रश्र्न असा विचारतात की विवाह ठीक आहे पण आपण एकेकांसोबत गोंधळ होणार नाही? अशा बर्‍याच मजेशीर प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत. 34 वर्षीय जुळे भाऊ जॉश आणि जेरेमी सेलर्स यांनी एका महोत्सवाच्या वेळी 31 वर्षीय ब्रिटनी आणि ब्रियाना स्पीयर्स यांची भेट घेतली. पहिल्याच भेटीत ते दोघे त्या दोघींच्या प्रेमात पडले. त्या दोघांनी नंतर या बहिणींसोर आपला प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला. जुळ्या बहिणीपैकी एक असलेल्या ब्रियाना ही म्हणते की, आम्ही मेळाव्यामध्ये होतो तेव्हा हे दोघे भाऊ आपल्यासोर हजर होते. ते आम्हाला पाहत होते, आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. एखाद्या चित्रपटाप्राणे, सर्वकाही धिम्या गतीने होत होते. आम्ही जुन्या जन्माच्या नातेसंबंधावर अवलंबून असतो. कदाचित आम्ही पुन्हा त्याचलोकांना भेटलो असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली. ब्रियाना आणि जेरेमी यांचा साखरपुडा झाला असून हे चार जण एकत्र लग्र करणार आहेत.