गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नितीश कुमारांनी लालूच्या बंगल्यात सोडले भूत

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मोठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तेजप्रताप यांनी मागील आठवड्यात आपले अधिकृत सरकारी निवसास्थान सोडले आहे परंतू हे सोडताना त्यांनी विचित्र कारण दिल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्यांने उंचावल्या आहेत.
 
मला या निवसास्थानातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इथे भूत सोडले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. नितीश आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी येथे भूत सोडल्यामुळेच मी ते निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. ते भूत मला त्रास देत होते असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
 
तेजप्रताप अतिधार्मिक आणि अंधश्रद्धाळू असल्याचे बोलले जाते. त्यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात आपल्या निवसास्थानी दुश्मन मारन जप केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. कारण त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात भष्ट्राचाराच्या आरोपांचा तपास करत होते. त्यांनी ज्योतिषांच्या सल्ल्याने निवासस्थानाच्या दक्षिण दिशेचा दरवाजाही बंद केला होता.
 
तेजप्रताप यांनी दुसरी नोटीस मिळाल्यानंतर बंगला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे आरजेडी प्रवक्ते यांनी म्हटले. सूत्राप्रमाणे गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आलेल्या नोटिशीत 15 टक्के भाडे वाढ करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री रामेश्वर हजारीयांनी तेजप्रताप यांना निवसास्थना रिकामे केल्याची माहिती दिली नसल्याचे सांगितले.