शनिवार, 11 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तिबेटमधील पवित्रस्थळांना भेट देण्याचा मार्ग मोकळा

international news
चीनने नथु ला मार्गाला परवानगी दिल्यानंतर तिबेटमधील पवित्रस्थळांना भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यासाठी यात्रेकरुंच्या नोंदणीला सुरुवातही केली आहे.  याआधी डोकलाम पठारावर भारत आणि चीन एकमेकांसमोर ठाकल्यानंतर नथु ला मार्गे भारतीय यात्रेकरुंना कैलास मानससरोवराला जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 
 
परराष्ट्र मंत्रालयातर्फे या यात्रेचे आयोजन आणि नियमन करण्यात येते. कैलास पर्वत आणि मानससरोवर हे चीनने गिळंकृत केलेल्या तिबेट प्रांतात येते. तिबेटला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात आलेला आहे. 8 जून ते 8 सप्टेंबर या काळामध्ये यात्रेकरुंच्या तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील. सिक्किममधील नथु ला आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून ही यात्रा करता येईल.