शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:27 IST)

टकल्यांचा मानसन्मान ठेवणारे जपानी रेस्टॉरंट

टकले लोक आपल्या छप्पर उडालेल्या रुपामुळे नेहमीच परेशान असतात. कारण त्यांचे टक्कल   सतत इतरांच्या टिंगलटवाळीचा विषय ठरते. टकल्यांना येणारा हा सार्वत्रिक अनुभव असताना जगाध्ये असेही एकठिकाण आहे, जिथे टकल्यांचा मोठा सन्मान केला जातो. या ठिकाणी टकलेपण चक्क सौंदर्याचे सर्वात मोठे लक्षण  मानले जाते. तिथे तुम्ही टक्कल पडलेल्या लोकांना कधीच तणावाखाली वा डोक्यावर एकही केस न उरल्यामुळे संकोचल्यासारखे पाहणार नाही. कारण तिथे त्यांना आनंदात राहण्यासाठी अनेक संधी व कारणे असतात. जपानधील एका स्टॉरंटध्ये टकल्यांचा एवढा मानसन्मान ठेवला जातो. तिथे येणार्‍या टकल्या ग्राहकांना खास प्रकारची सवलत दिली जाते. अशा लोकांचा तिथे मोठा आदर केला जातो आणि त्यांना विविध प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. असे वातावरण असेल तर टकल्यांना तिथे संकोच वाटूच शकत नाही. या रेस्टॉरंटची मालकीण योशिको टोयोडा सांगते की, टक्कल पडणे जपानध्ये अतिशय संवदेनशील मुद्दा समजला जातो. म्हणूनच अशा लोकांना आपल्या या दुर्बलतेुळे न्यूनगंड वाटू यासाठी त्यांचे या रेस्टॉरंटध्ये खास आदरातिथ्य करून खाण्यापिण्याच्या वस्तूंवर त्यांना सवलतही दिली जाते. हे लोक आपल्यासारखीच समस्या असलेल्या अनेकांना घेऊन गेले तर त्यांना आणखी सवलत दिली जाते.