बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (09:36 IST)

सरकार साहित्य संमेलनाला ५० लाखांची मदत करणार

बडोद्यात सुरु झालेल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन झालं. यावेळी पुढच्या वर्षापासून साहित्य संमेलनाला दुप्पट म्हणजे ५० लाखांची मदत शासन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर पुढच्या वर्षी पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमध्ये करा सर्व खर्च सरकार उचलणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलं. सोबतच रिद्धपूरला मराठी विद्यापीठ करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 
 
या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी साहित्यमहामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटीलही आदी मान्यवर उपस्थित होते.