शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (09:39 IST)

भयंकर : व्हाट्सअॅपच्या स्टेटसवरून अल्पवयीन मुलाची हत्या

पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये व्हाट्सअॅपच्या स्टेटसवरून एका अल्पवयीन मुलाची झालेली हत्या झाली आहे. अनिकेत शिंदे असे मृत मुलाचे नाव आहे. 
 
याप्रकरणी आठ आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात मृत अनिकेत शिंदे आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वैर निर्माण झाले. त्यानंतर त्यांच्यात व्हाट्सअॅप स्टेट्स वॉर सुरु झाले. यामध्ये एकाने किंग असे स्टेट्स ठेवले तर दुसऱ्याने आपणच बादशहा आहोत असे स्टेट्स ठेवले होते. दरम्यान, अनिकेत शिंदेने दोन दिवसांपूर्वी ओंकार झगडेला फोन करुन आम्हाला मला येताजाता कुत्रा कसे संबोधता असा जाब विचारला होता. अनिकेतला ओंकारने फोन केला आणि मला तुला भेटायचे आहे असे सांगितले. त्यानंतर अनिकेतने संग्राम दुर्ग भुईकोट किल्ल्यामध्ये बोलावले. त्यानुसार मृत अनिकेत शिंदे, रामनाथ ऊर्फ टिल्या सुखदेव घोडके, ओंकार मनोज बिसनावळ हे किल्ल्यात आले. त्यानंतर आरोपी ओंकार झगडे आणि किरण धनवटे हे पिस्तुल आणि कोयता घेऊन आले. मृत अनिकेतला बाजूला घेऊन ओंकार झगडेने त्याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस कोयत्याने वार केले. त्याचबरोबर फिर्यादी ओंकार बिसनाळे याच्या डोक्याला किरण धनवटे याने पिस्तुल लावला आणि ट्रिगर दाबला. मात्र, गोळी बाहेर आली नाही. तो पळाला. अनिकेत पळत असताना ठेच लागून खाली पडला. त्यानंतर ओंकार झगडे आणि किरण धनवटे यांनी अनिकेतवर पुन्हा कोयत्याने वार केले. ओंकारने मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.