बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सिंगापूरमध्ये प्रत्येक नागरिकाला सरकारकडून बोनस

सिंगापूर सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक अनोखे गिफ्ट देण्याची घोषणा केलीये. यात  देशातील प्रत्येक नागरिकाला सरकार बोनसच्या रूपात हजारों रूपये देणार आहे. सिंगापूरच्या अर्थमंत्र्यांनी २०१७ च्या बजेटमध्ये साधारण १० मिलियन सिंगापूर डॉलरच्या सरप्लेसची माहिती दिली. त्यांच्यानुसार, या सरप्लेसला ध्यानात घेऊन सिंगापूरच्या २१ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना ३०० सिंगापुरी डॉलर(साधारण १५ हजार रूपये)चं एसजी बोनस दिलं जाणार आहे. 
 
सिंगापूरचे अर्थमंत्री हेंग सूई कीट यांनी सांगितले की, दिलं जाणारं हे बोनस हे दर्शवतं की, सरकार सिंगापूरच्या विकासातून मिळणारा फायदा देशातील लोकांसमोर आणण्यासाठी कटिबद्ध आहेत. हे बोनस लोकांच्या इन्कमनुसार दिलं जाणार आहे. साधारण २७ लाख लोकांना हे बोनस २०१८ च्या शेवटापर्यंत दिलं जाणार आहे.