Nashik hit and run नाशिक रोडवरील अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
नाशिकच्या अंबड येथे झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. एका भरधाव वाहनाने त्यांच्या स्कूटरला धडक दिली आणि चालक पळून गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे शहरातील अंबड परिसरात एक भयानक रस्ता अपघात घडला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव वाहनाने स्कूटरवरून जाणाऱ्या दोन तरुणांना धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
अंकुश काकडे आणि स्वप्नील शिंदे अशी मृतांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही तरुण त्यांच्या स्कूटरवरून नाशिककडे जात असताना एका भरधाव वाहनाने त्यांना मागून अचानक धडक दिली.अपघातानंतर जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांना माहिती दिली. जखमी तरुणांना तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु मदत पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल आणि पीडितांना न्याय दिला जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Edited By- Dhanashri Naik