शहरातील पेलिकन पार्क येथे आगामी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी नियुक्त केलेल्या जागेची पाहणी करताना ते आज दुपारी बोलत होते. आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्वा हिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, उपअभियंता हेमंत नांदुर्डीकर, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आणि उद्यान निरीक्षक प्रशांत परब हे देखील उपस्थित होते.