मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 मार्च 2018 (10:40 IST)

आईचा व्यायाम पाहून हृतिकला घाम!

hritik suzan
फिटनेसच्या बाबतीमध्ये कायम दक्ष असलेला अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. गेली 20 वर्षे बॉलिवूडमध्ये असलेल्या हृतिकचा  फिटनेस आजही लाजवाब आहे. हृतिकने नुकतंच एका 65 वर्षांच्या महिलेला जीमध्ये वेटलिफ्टिंग करताना पाहिले. या महिलेचा हा व्यायाम पाहून हृतिकलाही घा घाम फुटला. त्याने इन्स्टाग्रावर याचा व्हिडीओ पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली आहे. 
 
ही महिला म्हणजे दुसरी कुणी नसून हृतिकची आई पिंकी रोशन आहेत. पिंकी रोशनही फिटनेसबाबत सदैव दक्ष असतात. आपल्या आईचे याबद्दल हृतिकने आभार मानले आहेत. 'मी तुला प्रेरणा समजू की प्रतिस्पर्धी हे मला माहिती नाही. पण तुझा मला अभिमान वाटतो. लव्ह यू. माझी आई झाल्याबद्दल धन्यवाद' अशी भावुक पोस्ट हृतिकने केली आहे.