1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 17 मार्च 2018 (16:59 IST)

अभिनेत्री रेखा यांनी ऐश्वर्यासाठी लिहिले एक पत्र

अभिनय क्षेत्रात दोन दशकं पूर्ण केल्याबद्दल, चित्रपटसृष्टीतील तिच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल अभिनेत्री रेखा यांनी ऐश्वर्यासाठी एक पत्र लिहिले आहे. तिच्या या प्रवासाचा ‘अप्रतिम’ असा उल्लेख रेखा यांनी केला आहे.

या पत्रात ऐश्वर्याच्या धैर्य, साहस, सकारात्मक ऊर्जा या गुणांविषयी उल्लेख करताना संकटांवरही मात करत तू एका ताऱ्याप्रमाणे चमकलीस असं त्यांनी म्हटलं. चंद्राप्रमाणे निखळ सौंदर्य असलेल्या अभिनेत्रीने अनेकांच्याच हृदयाचा ठोका चुकवला, या शब्दांत रेखा यांनी ऐश्वर्याचं वर्णन केलं. तर तिने साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी आराध्याची ‘अम्मा’ (आई) म्हणून सध्या साकारत असलेली भूमिका सर्वोत्कृष्ट असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. तुझा कलाविष्कार अशाचप्रकारे चाहत्यांपर्यंत पोहोचत राहू दे असं म्हणत त्यांनी ऐश्वर्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.