1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 मार्च 2018 (16:02 IST)

अभिनेता नरेंद्र झा यांचे निधन

narendra jha no more

अभिनेता नरेंद्र झा (५५) यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. यापूर्वीही दोन वेळा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. नरेंद्र कुटुंबियांसमवेत फार्महाऊसवर सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. तिथेच सकाळी ५.०० वाजल्याच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. 

विशाल भारद्वाज निर्मित सिनेमा 'हैदर'मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. ऋतिक रोशनसोबत ते काबिल सिनेमात दिसले होते. तर शाहरुखच्या रईसमध्येही त्यांनी भूमिका बजावली होती. याशिवाय अभिनेता प्रभाससोबत ते 'साहो' या सिनेमात काम करत होते. नरेंद्र झा यांनी अनेक टीव्ही सीरियल्समध्येही काम केल आहे. 

मुळचे बिहारचे असलेल्या नरेंद्र यांनी आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनवरच्या 'शांति' या कार्यक्रमातून केली होती. त्यानंतर ते अनेक कार्यक्रमांत दिसले. नरेंद्र यांनी हिंदीशिवाय तमिळ, तेलुगु भाषांमध्येही काम केल आहे.