मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 मार्च 2018 (10:57 IST)

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा सिनेमा वीकेंडमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. आतापर्यंत या सिनेमाने २१.०८ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट समीक्षकांनी या सिनेमाचे चांगले रिव्ह्यू लिहिले पण तरीही प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा काही उतरला नाही. 

परी हा सिनेमा भयपट आहे. मात्र या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर भयपट सिनेमासारखी याची स्टोरी नाहीये. या सिनेमातील भूत कोणत्याही प्रकारचा बदला घेत नाही. सिनेमाची कथा बॉलिवूडच्या इतर हॉरर फिल्म्सपेक्षा वेगळी आहे. या सिनेमात अनुष्कासोबत अभिनेता परमब्रता चटोपाध्याय यांची प्रमुख भूमिका आहे.सिनेमाची निर्मिती स्लेट प्रॉडक्शन आणि क्रिअर्ज यांनी एकत्रितपणे केली आहे.