बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 मार्च 2018 (10:35 IST)

अभिनेत्री सोनम कपूरने आपला विवाह पुढे ढकलला

श्रीदेवीच्या निधनामुळे अभिनेत्री सोनम कपूर हिने आपला विवाह पुढे ढकलला आहे. काकूच्या जाण्याने सोनमला देखील मोठा धक्का बसला आहे. सोनम कपूरचा विवाह याच वर्षी होणार होता. पण कपूर कुटुंबियांनी हा विवाहा सोहळा आता पुढे ढकलला आहे. सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांच्या विवाहाची तयारी देखील झाली होती. अनिल कपूर यांच्या घरी ही तयारी सुरु होती. दुबईमध्ये झालेल्या मोहित मारवाह याच्या विवाहानंतर सोनम आणि आनंदच्या लग्नाचा विचार होता. पण आता हा विवाह पुढे ढकलण्यात आला आहे.