1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 मार्च 2018 (10:40 IST)

सनी झाली सरोगसीद्वारे जुळ्याची आई

sunney leony

सनीने लिओनीने नुकतेच सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. सनीने इन्स्टाग्रामवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर करत ‘आता माझे कुटुंब पूर्ण झाले’ असे म्हटले. या फोटोमध्ये सनीच्या हातात एक बाळ आहे तर तिचा पती डॅनियलच्या हातात एक बाळ आहे. या दोघांच्या मध्ये छोटी निशा बसली आहे. 

या फोटोद्वारे सनीने तिच्या मुलांची नावं ही सर्वांना सांगितली. सनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२१ जून २०१७ या दिवशी मला कळलं की अगदी थोड्या काळात मी तीन मुलांची आई होणार आहे. आम्ही मुलांचा विचार करायला सुरूवात केली आणि संसाराच्या एवढ्या वर्षांनंतर आता माझं कुटुंब अशर सिंग वेबर, नोहा सिंग वेबर आणि निशा कौर वेबरमुळे पूर्ण झालं आहे. काही आठवड्यांपूर्वी माझ्या मुलांचा जन्म झाला असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून ते आमच्याच हृदयात होते. देवाच्या कृपेने मला एक मोठं कुटुंब मिळालं आणि मला आणि डॅनियलला सुंदर अशी तीन मुलं आहेत.’