मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मार्च 2018 (12:55 IST)

आशुतोषच्या सिनेमामध्ये करिना

karina in ashutosh's film
करिना कपूर प्रेग्रंट झाल्यापासून रुपेरी पडापासून लांबच राहिली होती. आता तैमूर मोठा झाल्यामुळे करिनाने आता पुन्हा काम करायला सुरुवात करायचे ठरवले आहे. शशांक घोषच्या ' वीरे दी वेडिंग'मधून ती पुनरागमन करणार आहे. याव्यतिरिक्त ती आणखी काही निर्मात्यांच्या सिनेमांमध्येही काम करणार असल्याचेही समजले होते. मात्र करिनाकडून अद्याप त्याला कोणताही दुजोरा दिलेला नाही. आशुतोष गोवारीकरच्या आगामी सिनेमामध्येही करिना काम  करणार असल्याचे समजले आहे. नुकताच रिलीज झालेला मराठी 'आपला माणूस'चा हिंदी रिमेक करायचे आशुतोषने ठरवले आहे. अजय देवगणची र्निर्मिती असलेल्या 'आपला माणूस'मध्ये नाना पाटेकर मुख्य रोलमध्ये आहे. त्याच्या हिंदी रिमेकला करिनाला विचारण्यात आल्याचे समजते आहे. मात्र सध्या तरी करिना 'वीरे दी वेडिंग'मधून पुनरागन करणार आहे. चार मैत्रिणींची ही कथा म्हणजे टिपिकल लव्ह स्टोरी नाही. रेहा कपूर आणि एकता कपूर या  निर्मात्या महिलाच असल्याने करिनाने त्याला होकार कळवला आहे. 'वीरे दी वेडिंग'मध्ये करिनाच्या बरोबर सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया आणि सुमित व्यास ही बाकीची कलाकार मंडळी आहेत आणि हा सिनेमा 1 जूनला रिलीज होतो आहे.