1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By
Last Updated : बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (16:11 IST)

श्रीदेवीला अनोख्या पद्धतीने श्रध्‍दांजली

bollywood gossip
अमूल कंपनीनेही श्रीदेवी यांना कार्टूनच्‍या माध्‍यमातून श्रध्‍दांजली अर्पित केली आहे. या कार्टूनमध्‍ये श्रीदेवी यांच्‍या चित्रपटातील अनेक भूमिकांची झलक पाहायला मिळते. त्‍यात नगीना, मिस्टर इंडिया, खुदा गवाह आणि मॉम या चित्रपटांचादेखील समावेश आहे. श्रीदेवी यांना आठवण करत अमूलने लिहिले आहे, ‘वो लम्हे हम हमेशा याद रखेंगे.....’


तर सॅण्‍ड आर्टिस्‍ट सुदर्शन पटनायक यांनीही वाळूचे शिल्‍प रेखाटून श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुदर्शन यांनी ओडिशामध्‍ये समुद्र किनारी श्रीदेवी यांची सुंदर प्रतिमा बनवून लिहिले आहे, 'आम्‍हाला तुमची आठवण येईल. रेस्ट इन पीस (RIP) श्रीदेवी' असे लिहिले आहे.