1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:34 IST)

श्री देवीच्या मृत्यूचे गूढ वाढले अर्जुन कपूर दुबईत

shridevi death
अभिनेत्री श्री देवी यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. जो पर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत तो पर्यंत आम्ही बोनी कपूर आणि मृतदेह भारतात पाठवणार नाही अशी भूमिका दुबई पोलिसांनी घेतली आहे. न्यायलयीन प्रक्रिया सुरु झाली असल्याने आता अजून शंका उपस्थित करण्यात येत आहे. श्री देवी यांचा मृत्यू हा घातपात होता का असा प्रश्न समोर आला आहे. दुबई पोलिसांनी पती बोनी कपूर याची चौकशी सुरु केली असून त्याचा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आता अनेक शंका निर्माण होत आहे.

आपल्या देशात सुद्धा आता अनेक लोक शंका विचारू लागले आहेत. ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीदेवी यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.

बालकृष्णन पत्रात नमूद करतात की आघोळीचा बाथटब हा फक्त 3 फूट खोल असतो. त्यामुळे अशावेळी त्यात कोणी कसा काय बुडू शकतो? तसंच तिच्या शरीरामध्ये अल्कोहलचं प्रमाणंही कमी होतं.

सर्वच बाबतीती आपले मत  व्यक्त करत असलेले भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा श्री देवी यांच्यावरून वक्तव्य केलं आहे. यामध्ये ते म्हणतात की  श्रीदेवी यांची हत्या झाली असावी ज्या ठिकाणी त्या थांबल्या होत्या त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तर श्रीदेवी हार्ड लिकर (दारु) सेवन करत नसे. त्यामुळे मला असं वाटतं की, तिची हत्या करण्यात आली असावी. त्यामुळे आता देशात तर्क वितर्क यांना उधाण आले आहे.