मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:33 IST)

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव आज दुपारनंतर मुंबईत आणणार

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव आज दुपारनंतर  मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. दुबईतील कायदेशीर प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे सोमवारी मृतदेह आणता आला नव्‍हता. दरम्यान, मुंबईत अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली आहे.

श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातमीनंतर रविवारपासूनच त्यांच्या मुंबईतील निवासस्‍थानाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे. सोमवारीही मृतदेह आणला जाण्याची शक्यता असल्याने चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र, दुबईतील कायदेशीर प्रक्रियेला विलंब झाला. 

दरम्यान, श्रीदेवीचा मृत्यू बाथ टबमध्ये बुडून झाल्याचे एका अहवालानुसार पुढे आले असून त्यांचा मृत्यू संशयाच्या भोवर्‍यात असल्याचे बोलले जात आहे. तसेच श्रीदेवीच्या शवविच्‍छेदन अहवालात अल्‍कोहोलचे अंश आढळले आहेत. दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर व बहिण श्रीमाला यांची चौकशी केली आहे.  या प्रकरणाभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाल्यामुळे श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे आणखी एकदा शवविच्छेदन होऊ शकते असेही बोलले जात आहे.