बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (15:03 IST)

चुगलीखोर सोनाक्षी!

बॉलिवूडमध्ये अद्यापी सूर गवसला नसलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एकेकाळीचुगलीखोर असल्याचे तिनेच उघड केले आहे. सोनाक्षीने आपले हे गुपित नुकतेच उघड केले. स्टार प्लसवरील इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स कार्यक्रमाच्या आगामी भागात ती करण जोहर आणि रोहित शेट्टी या दोन परीक्षकांबरोबर अतिथी परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. यावेळी करण जोहरने आपल्या शाळेच्या दिवसांतील एक विचित्र किस्सा सर्वांना ऐकविला. हा किस्सा ऐकत असताना सोनाक्षी सिन्हा गालातल्या गालात हसत होती. त्यावर ती म्हणाली, मला असा चोंबडेपणा करायला फार आवडतो. लहानपणी मी अशा चुगल्या भरपूर केल्या आहेत.