मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

वजनाची तिच्या करतील, ‘ब्रेकिंग न्यूज़’ बर का!

ट्रेड मिल वर चालून पडल्या आमच्या पायाच्या तुकड्या,
अन जिथे तिथे वट खातात बॉलीवुड च्या “सुकड्या”
 
फिगर सांभाळताना येई, आमच्या तोंडाला फेस,
चेंजिंग रूम मध्ये फिट होईना, आवडलेला ड्रेस
 
तलम, तंग कपडे त्या मिरवतात छान,
ओटी-पोटी सपाट आणि देहाची कमान
 
असणार नाही तर काय? त्यांना मदत किती सारी,
डायटीशियन, gym इंस्ट्रक्टर असती भारी, भारी
 
आमचे तसे नाही, सर्व आमच्या वरच असते,
घरचे, दारचे करून मगच gym ला पळावे लागते
 
Calories असतो मोजत प्रत्येक क्षण नी क्षण,
डाइटिंगचा उडतो फज्जा, जेव्हा जेव्हा येती सण
 
वैताग म्हणजे, कित्ती झालाय metabolism मंद,
100 gm उतरले तरी भलताच होतो आनंद
 
बॉलीवुडच्या सुकड्यांना पाहून होतो जिवाचा तळतळाट,
चित्रपट, ads, मासिके, टीवी सर्वत्र त्यांचाच सुळसुळाट
 
त्यांच्या फिगरचा आदर्श ठेवला, तर वाटत खूप डिप्रेस,
तोंडावर ताबा ठेवायचा कसा, किती करावे appetite सप्रेस?
 
वाटत, एकदा सारी बंधन टाकावीत झुगारून,
शिरा, पुरी, जिलेबी अन् बासुंदीही प्यावी भरभरून
 
पण मग फिगरचा आपल्या, उड़ेल न् हो खुर्दा,
बॉलीवुडच्या सुकड्यांना मग कशी देणार स्पर्धा?
 
बॉलीवुड च्या सुकड्यांवर वार्ताहरांचे बारीक लक्ष,
वजनातील फेरफारी बद्दल ते असतात नेहमीच दक्ष
 
थोड़ी जरी सुटली अंगाने एकही तारका
वजनाची तिच्या करतील, ‘ब्रेकिंग न्यूज़’ बर का!
 
अशा तणावा खाली किती दबून जात असेल जीव,
बॉलीवुडच्या सुकड्यांची, तशी येतेही फारच कीव
 
आपल काय छान, जीवन स्वछंदी ते किती,
दोन चार किलो इकडे तिकडे, कोणाची भीति?
 
बॉलीवुडच्या “सुकड्या” होवोत लखलाभ बॉलीवुडला,
आमच्या सारख्या “सुदृढ” च पाहिजेत संसाराला.