रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 मार्च 2018 (10:31 IST)

हनीमून सोडून पळून आला होता अजय देवगण

अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'रेड' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट 16 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजयने चित्रपट आणि त्याच्या पर्सनल लाइफविषयी काही किस्से शेअर केले. त्याने सांगितले की, मी माझा हनीमून अर्ध्यातच सोडून पळून आलो होतो. मला हनीमूनसाठीच्या सुट्या जरा जास्तच वाटत होत्या, त्यामुळे मी पळून आलो होतो. 
 
अजयने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी तर केवळ अर्ध्या तासातच लग्र उरकले होते. ते पण माझ्या घराच्या छतावर. रूमच्या बाहेर निघालो, लग्र केले अन्‌ परत रूमध्ये गेलो. हनीमूनसाठी मी आणि काजोलने तब्बल दोन महिने सुट्या घेतल्या होत्या. परंतु मी माझ्या हनीमूनमधून एका महिन्यातच पळून आलो. वास्तविक दोन महिन्यांच्या सुट्या जरा जास्तच झाल्या होत्या.
 
पुढे बोलताना अजयने म्हटले की, बदलत्या वातावरणात मी स्वतःला बदलू शकत नाही. वास्तविक त्याने स्वतःध्ये बरेचसे बदल केले आहेत. याविषयी अजय सांगतो की, आता मी थोडेफार बोलतही आहे, जेणेकरून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याचा फायदा होईल. त्याने त्याच्या अपकगिं प्रोजेक्टविषयी सांगितले की, मी एका कथेवर काम करीत आहे. ज्याचे डायरेक्शन मी स्वतः करणार आहे. ही कथा अन्य कथांच्या तुलनेत एकदम वेगळी आहे. वेळ आल्यानंतर मी यावर नक्कीच बोलणे पसंत करेन.