मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कपिलच्या शो पहिल्या एपिसोडमध्ये अजय देवगन

कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. कपिलचा हा नवा शो फॅमिली टाईम विद कपिल शर्मा हा एक गेम शो असणार आहे. सोबतच यामध्ये धमाल, मस्ती पाहायला मिळणार आहे. या शोकडून कपिलला खूप आशा आहे.

या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता अजय देवगन हजेरी लावणार आहे. रेड या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजय पहिल्या एपिसोडमध्ये उपस्थित राहणार आहे. अजय सोबतच इलियाना डिक्रुज देखील या सिनेमात काम करतेय. त्यामुळे ती देखील या शोमध्ये येणार आहे.अजयने कपिलसोबत एक प्रोमो देखील शूट केला आहे. येत्या 25 मार्चला शो सुरु होऊ शकतो.